न्यायाधीश लाच प्रकरण; SC चा ‘एसआयटी’ला नकार

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश लाच प्रकरणी‘एसआयटी’ स्थापन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकारदिला. 'न्यायालयातील ज्येष्ठ वकील बेताल आरोप करतआहेत,' असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.न्यायालयाने एसआयटीची मागणी करणारी याचिकाफेटाळली आहे. एका मेडिकल कॉलेजला सर्वोच्चन्यायालयात त्यांच्या बाजुने निकाल देण्यासाठी लाचघेतल्याचा आरोप ओडिशा उच्च न्यायालयाच्यान्यायाधीशांवर करण्यात आला होता. याप्रकरणीसीबीअयने एफआयआर दाखल केली आहे. त्यामध्येकोणत्याही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे नावघेण्यात आलेले नाही. यासंपूर्ण प्रकरणाची चौकशीएसआयटी मार्फत करण्यात यावी, अशी याचिका प्रशांतभूषण यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने यायाचिकेवर निकाल देताना म्हटले ‘या याचिकेने देशातीलन्यायसंस्थेच्या प्रतिमेचे नुकसान झाले आहे. सर्वोच्चन्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिंन्ह उपस्थित झालेआहे.’ सीबीआयने दाखल केलेली एफआयआरकोणत्याही न्यायाधीशाविरुध्द नाही, असा खुलासासर्वोच्च न्यायालयाने केला आहे.
No comments:
Post a Comment