बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या गाड्यांचे फोटो पाठवा आणि पैसे मिळवा

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांना बेकायदेशीरपणे पार्क करण्यात येणा-या गाड्यांचे फोटो काढून प्रशासनाला पाठवण्याचं आवाहन केलं आहे. गाड्यांचे फोटो पाठवणा-यांना बक्षिसही दिलं जाईल असं नितीन गडकरींनी सांगितलं आहे. 'आपल्या मंत्रालयाबाहेर नसलेल्या पार्किंग लॉटमुळे अॅम्बेसिडर गाड्या आणि प्रतिष्ठित लोकांना संसदेच्या मार्गावरच पार्किंग करावं लागतं, ज्यामुळे संसदेकडे येणा-या रस्त्यावर कोंडी होते. हे फारच लाजिरवाणं असल्याचं', नितीन गडकरी यावेळी बोलले आहेत. 'मोटर वाहन कायद्यात मी एक तरतूद करणार आहे. रस्त्यावर असलेल्या कारचे फोटो तुमच्या मोबाइल फोनवर घ्या आणि संबंधित विभागाला किंवा पोलिसांना पाठवा असं आवाहन त्यातून करणार आहे. बेकायदेशीर पार्किंगसाठी500 रुपयांचा दंड असून, त्यातील 10 टक्के रक्कम गाडीची माहिती पाठवणा-याला देण्यात येईल', असं नितीन गडकरी बोलले आहेत.
No comments:
Post a Comment