नाशिकमध्ये कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण
बेकायदा सोनोग्राफी मशीन व संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी सातपूरमधील महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील डॉ. तुषार पाटील यांच्या शाकुंतल डायग्नोस्टिक केंद्रासह सोनोग्राफी मशीन मनपा वैद्यकीय विभागाने सील केले असून, केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, यासंदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी मनपाने जिल्हा रुग्णालयास अहवाल सादर करूनही पाटील यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याने जिल्हा रुग्णालयाच्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. डॉ. पाटील हे वाहनाद्वारे जव्हार, मोखाडा यासह आदिवासी भागात फिरून गर्भलिंग निदान चाचणी करून देत असल्याची माहिती चौकशी पथकाच्या हाती आली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात पीसीपीएनडीटी कायदा आणि सुधारित कायद्यानुसार ‘आमची मुलगी’ या संकेतस्थळावर सातपूर कॉलनी येथील शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. तुषार पाटील यांच्या वाहनाबाबत मनपाच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती.
No comments:
Post a Comment