रघुराम राजन यांचा राजकारणालानकार

काही दिवसांपूर्वीच राज्यसभेच्या उमेदवारीबद्दलचाप्रस्ताव आम आदमी पक्षाने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नरराजन यांना दिला होता. राजन यांना याबद्दल माध्यमांनीविचारले असता, शिक्षणाशी संबंधित कामात सध्या व्यस्तअसल्याचे सांगितले आहे. राज्यसभेच्या खासदारकीच्याप्रस्तावावर एका पत्रकातून राजन यांनी प्रतिक्रिया दिली. सध्या राजन यांची शिक्षण कार्याला स्वल्पविराम देण्याचीइच्छा नसल्यामुळेच राज्यसभेवर जाण्यास त्यांनी नकारदिला आहे. भारतातील अनेक शैक्षणिक कार्यांमध्ये सध्याराजन व्यस्त आहेत. त्याचबरोबर शिकागो विद्यापीठात तेपूर्णवेळ अध्यापनाचे काम करतात, असे राजनयांच्यावतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूदकरण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तीन जणांनाआपकडून राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. यातीलएका जागेसाठी आपकडून राजन यांना विचारण्यात आलेहोते.
No comments:
Post a Comment