दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
मिस युनिव्हर्स २०१७ किताब दक्षिण अफ्रिकेची डेमी नेल पीटर्सला जाहीर करण्यात आला. डेमी नेल पीटर्सला २०१६ ची मिस युनिव्हर्स फ्रान्सची आयरिस मिट्टीनेएर हिने प्रदान केला. १९७८ मध्ये दक्षिण आफ्रिकेन मिस युनिव्हर्स जिंकला होता. डेमी नेल पीटर्सला ९३ प्रतिस्पर्धी उमेदवारांचे आव्हान होते. अंतिम फेरीसाठी फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने या स्पर्धेत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचे असलेली डेमी नेल पीटर्स व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर आहे. दक्षिण आफ्रिकेला ३९ वर्षांनंतर हा किताब मिळाला आहे तसाच हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा किताब आहे. यंदाच्या मिस युनिव्हर्स २०१७ साठी भारताच्या श्रध्दा शशीधरने प्रतिनिधीत्व केले होते. श्रद्धा ‘यामाहा फॅसिनो मिस दीवा २०१७’ची विजेती आहे.
No comments:
Post a Comment