'मूडीज'ने भारताचं रेटिंग वाढवताच शेअर बाजारात तेजी
एखाद्या देशाची अर्थव्यवस्था परकीय गुंतवणकीसाठी किती पोषक आहे. यासंबंधीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं रेटिंग काढणाऱ्या 'मूडीज्' या अमेरिकन संस्थेनं भारताच्या रेटिंग्जमध्ये शुक्रवारी वाढ केली. 'मूडीज्' या संस्थेने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने 'मूडीज्'ने हा निर्णय घेतला आहे. 'मूडीज्' ने भारताचं रेटिंग वाढवताच देशांतर्गंत शेअर बाजारातही उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. मुडीजने भारताच्या अर्थविषयक रेटिंगमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर सुधारणा झाली आहे.'मूडीज्'ने 2004 साली भारताला बीएए 3 हे रेटिंग दिले होते, त्यानंतर आता ते वाढवून बीएए 2 करण्यात आले. या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पत ही सुधारणार आहे.
No comments:
Post a Comment