Sunday, 19 November 2017

अनिकेत कोथळे खून प्रकरणात'डीएनए' ठरणार निर्णायक

अनिकेत कोथळे खून प्रकरणात'डीएनए' ठरणार निर्णायक


अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलिस कोठडीत अमानुष खून करून त्याचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळण्यात आला होता. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह अन्य पोलिसांना अटक झाली आहे. यामध्ये अनिकेतचा अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांना मिळालेला आहे. परंतु हा मृतदेह अनिकेतचाच होता का, असा आक्षेप काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे डीएनए चाचणीवर आता या तपासाचे  भवितव्य राहणार आहे. याबाबत  अ‍ॅड. श्रीकांत जाधव म्हणाले, डीएनए ही आताच्या काळात विश्‍वासार्ह चाचणी आहे. मृतदेह पूर्णपणे जळाला असला तरी त्याची राख जमा करून त्याचीही डीएनए चाचणी करता येते. यातून सत्य बाहेर येऊ शकते. मात्र यासाठी उच्च न्यायालयाने नियम केलेले आहेत. त्या नियमात राहूनच चाचणी होते. अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ठेवण, खुणा यावरूनही ओळख पटविता येते.


No comments:

Post a Comment