Friday, 24 November 2017

दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी

दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी

भारताचा संयुक्त राष्ट्रात मंगळवारी मोठा विजय झाला असून दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या शेवटच्या जागेसाठी दलवीर भंडारी आणि ब्रिटनच्या उमेदवारात लढत होणार होती. मात्र अखेरच्या क्षणी ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतल्याने दलवीर भंडारींचा विजय झाला. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते. न्यू यॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मतं मिळाली, तर सुरक्षा परिषदेच्या सर्वच्या सर्व 15 सदस्यांनीही त्यांनाच मत दिलं. याआधी नाट्यक्रम घडामोडी घडल्या आणि ब्रिटनने निवडणूक पार पडण्याच्या काही क्षण आधीच आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे दलवीर भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

No comments:

Post a Comment