निरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांना २ लाखांची मदत
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामधल्या अकोले इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत काम सुरु असलाना बोगद्याची क्रेन तुटून, सोमवारी संध्याकाळी आठ कामगारांचा मृत्यू झाला. यातील तीन कामगार उत्तरप्रदेशचे असून, आंध्रप्रदेश आणि ओरिसाचे प्रत्येकी दोन जण आहेत. तर एक कामगार इंदापूरचा आहे. गेल्या काही वर्षांपासून इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचं काम सुरु आहे. या मृत झालेल्या कामगारांना शासनाकडून दोन रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी आपलं काम संपवून कामगार क्रेनच्या मदतीनं वर येत असताना क्रेन तुटून ही दुर्घटना घडली. कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला आह. तसेच यापूर्वीही या ठिकाणी दुर्घटना घडून अनेकांना अपंगत्व आल्याची तक्रारही त्यांनी केली.
No comments:
Post a Comment