Wednesday, 8 November 2017

सोनिया गांधींचे धक्कादायक पत्र

सोनिया गांधींचे धक्कादायक पत्र


काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अर्थमंत्री पी. चिदंबरमयांना पाठवलेले एक पत्र टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्याहाती लागले आहे. या पात्रात वाजपेयी सरकारच्याकाळातील स्टिंग ऑपरेशनप्रकरणी तहलकामासिकाविरोधात सुरु असलेली चौकशी बंद करण्याचेआदेश सोनिया गांधींनी दिले होते तसेच चिदंबरम यांनायाप्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची सूचना सोनियागांधी यांनी केली होती, असे समोर आले आहे. ज्यावेळीवाजपेयी सरकार सत्तेत होते त्यावेळी तहलका यामासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने देशात खळबळउडाली होती. भाजप नेते शस्त्रास्त्रांची खरेदी- विक्रीकरणाऱ्या दलालांकडून लाच घेत असल्याचे या स्टिंगऑपरेशनमधून उघड झाले होते. तहलकामासिकाविरोधात त्यावेळी वाजपेयी सरकारने चौकशीचेआदेश दिले होते. तहलका मासिकाचे संपादक तरुणतेजपाल तसेच तहलकाचे प्रोप्रायटर शंकर शर्मा, देविनामेहरा यांची केंद्र सरकार अस्थिर करण्याचा कटरचल्याप्रकरणी चौकशी झाली होती. तहलकाच्याचौकशीला त्यावेळी ईडी, सेबी या यंत्रणांनीही सुरुवातकेली होती.


No comments:

Post a Comment