गुजरात निवडणुकीत काँग्रेसची गोची

येत्या महिन्यात गुजरात होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली. हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समिती (पास) आणि काँग्रेस पक्षांमध्ये झालेल्या युतीच्या करारानुसार काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्या पासच्या २० उमेदवारांना संधी देणार असल्याचा निर्णय झाला होता. मात्र ७७ जागेंसाठी जाहीर झालेल्या यादीत हार्दिक पटेल यांच्या फक्त दोन उमेदवारांना संधी देण्यात आल्या मुळे पाटीदार संघाने संपूर्ण राष्ट्रात निदर्शने केली. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांनी देखील काँग्रेस पक्षाबाबत नाराजी दाखवली. पहिली यादी जाहीर करताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस यंदा स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तैयारीत असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment