Wednesday, 15 November 2017

गेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८००शेतक-यांच्या आत्महत्या

गेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८००शेतक-यांच्या आत्महत्या


हे सरकार शेतकयांचं आहे, असं राज्य सरकार म्हणतअसलं तरी हे वास्तव नसल्याचं उघड झालं आहे. शेतकयांसाठी केवळ घोषणा करणाया या सरकारच्या सत्तेतगेल्या १० महिन्यात मराठवाड्यात ८०० शेतकऱ्यांनीआत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. म्हणजे महिन्याला८० आत्महत्या मराठवाड्यात सुरु असल्याचं जळजळीतवास्तव समोर आलंय. त्यामुळे सरकार अजूनही शेतकयांचे प्रश्न सोड्वण्यात अपयशी ठरत असल्याचं दिसतं. सततच्या दुष्काळामुळं शेतकरी मेटाकुटीला आला होता. त्यात सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली खरी मात्रअजूनही शेतकरी कर्जमाफी कधी होणार याची वाटपाहत आहे. यामुळं सुद्धा शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि आत्महत्यांचे दुष्टचक्र सुरूच आहे. कर्जमाफीचालाभ मिळत नाही, पीक कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना उभंकरत नाही, अशात शेतकरी करणार तरी काय असा प्रश्नविचारला जातोय.

No comments:

Post a Comment