लातूर पोलिस कोठडीत गुजरातच्या व्यापार्याचा मृत्यू
११ आक्टोबर २०१७ रोजी लातूर ते मुंबई मार्गावर असलेल्या एका ट्रॅव्हल बसवर दरोडा पडला होता. त्यात प्रवाशांचे सुमारे साडेचार लाख रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथील नरेंद्र होडियल (वय ४५) याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. तो कोठडीत असताना त्याच्या छातीत दुखत असल्याचे कारण सांगत पोलिसांनी त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाला होता. कोठडीत मरण पावलेल्या आरोपीचे शवविच्छेदन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात केले जाते. त्यामुळे नरेंद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेडच्या रुग्णालयात हलविण्यात आला होता. लातूरच्या पोलिसांनी हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले होते. तरी शवविच्छेदन अहवालात नरेंद्र यांचा मृत्यू पोटात अॅसिड गेल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांनीच अॅसिड पाजल्याचा आरोप केला आहे.
No comments:
Post a Comment