Sunday, 19 November 2017

मुंबई-पुणे प्रवास आता शक्य होणार फक्त २० मिनटात

मुंबई-पुणे प्रवास आता शक्य होणार फक्त २० मिनटात


मुंबई पुणे प्रवास फक्त २० मिनिटात हायपरलूपच्या माध्यमातून प्रवास शक्य होणार आहे. गुरुवारी यासंदर्भातील करार राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने केला आहे. हा करार व्हर्जिन हायपरलूप वन या कंपनीशी करण्यात आला आहे. पुढील सहा आठवड्यांत हायपरलूप वन ही कंपनी आणि पीएमआरडीए पुणे – मुंबई दरम्यान हायपर लूप करता येईल का? त्यात काय अडचणी येऊ शकतात? प्रकल्पाचा खर्च किती असेल आणि प्रवाशांची संख्या किती असेल. याचा अहवाल एकत्रितपणे तयार करणार आहेत. अशा प्रकारचा हायपरपुल तैयार झाल्यास महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या शहरांमध्ये कमालीचे कनेक्शन होऊन यामुळे नागरिकांना व व्यावसायिकांना लाभ होईल.


No comments:

Post a Comment