बँकांचे व्यवहार मराठीत करण्याचा मनसेचा इशारा
मनसेचे पुढील आंदोलन हे बँकांमध्ये मराठी भाषेच्या आग्रहासाठी असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दिला होता. बँकांमध्ये स्थानिक भाषेतून व्यवहार व्हायला हवेत, असा आरबीआयचा नियम आहे. परंतु, आपल्याकडे सर्रास हिंदी आणि इंग्रजीतून व्यवहार होतात, असे ते म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या इशाऱ्या नंतर लगेचच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. बँकांमध्ये मराठी भाषेत व्यवहार करावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देणारे पत्र आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील बँकांच्या कार्यालयांमध्ये दिले आहे. अशा प्रकारच्या मागणीचे पत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे - कुर्ला संकुलातील पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि अलाहाबाद बँकेसह इतर बँकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन दिले. मराठीत व्यवहार सुरू न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे.
No comments:
Post a Comment