भारतात ५१ टक्के महिला अशक्त

ग्लोबल न्युट्रिशन २०१७ च्या अहवालातून भारतीयमहिलांच्या आरोग्याबाबत धक्कादायक आकडेवारीसमोर आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जिनिव्हा येथेझालेल्या वर्ल्ड हेल्थ असेंब्ली (डब्ल्यूएचए) च्या १४०देशांच्या परिस्थितीचे या अहवालात विश्लेषण करण्यातआले आहे. या अहवालानुसार, अशक्त महिलांचे प्रमाणभारतात सर्वाधिक आहे. भारतापाठोपाठ चीन,पाकिस्तान, नायजेरिया आणि इंडोनेशियामध्ये अशक्तमहिला मोठ्या प्रमाणात आहेत. प्रजननाचे वयअसलेल्या १५ ते ४९ वयोगटातील ५१ टक्के महिलाअशक्त तर, पाच स्त्रियांच्या मागे एक महिला लठ्ठ आहे.यामुळे देशातील लठ्ठ महिलांचे हे प्रमाण २२ टक्क्यानेवाढले आहे. २०१६ मध्ये भारतात अशक्त महिलांचेप्रमाण ४८ टक्के होते, ते २०१७ मध्ये ५१ टक्के झालेआहे. भारतातील पोषण आहारात असणारी मोठीअसमानता यासाठी कारणीभूत असून यासाठीभारताकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे चित्रआहे.
No comments:
Post a Comment