वैष्णोदेवीचे आता दररोज फक्त ५०हजार भाविकांना घडणार दर्शन

वैष्णोदेवीच्या दर्शनाबद्दल महत्त्वाचा आदेश राष्ट्रीय हरितलवादाने दिल्यामुळे आता ५० हजार भाविकांनाच एकादिवसात वैष्णोदेवीचे दर्शन घेता येईल. याशिवायकोणतेही बांधकाम वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात नकरण्याच्या सूचनादेखील हरित लवादाने केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत वैष्णोदेवी परिसरात ५०हजारांपेक्षा जास्त लोक पोहोचणार नाहीत, याची काळजीघ्या, असे आदेश हरित लवादाकडून प्रशासनाला देण्यातआले आहेत. मोठ्या संख्येने भाविक वैष्णोदेवीचे दर्शनघेण्यासाठी येथे पोहचतात. ५० हजार ऐवढीचवैष्णोदेवीच्या दरबाराची क्षमता असल्यामुळे दरबारातयापेक्षा जास्त भाविकांना जाण्याची परवानगी दिल्यास तेधोकादायक ठरु शकते. हरित लवादाने त्यामुळेचभाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment