एलआयसी ‘आधार’शी लिंक करण्याच्या नावाने फसवणूक

मोबाइल नंबर आणि बँक खाती जोडण्याव्यतिरिक्त, आता इन्शुरन्स पॉलिसीला आधार कार्डशी जोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत त्यासाठी देण्यात आली आहे. परंतु या अत्यावश्यकपणाच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी फसवणूक सुरु केली आहे. या संदर्भात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ने आपल्या वेबसाइटवर याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की एलआयसी पॉलिसीला आधार लिंक करण्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. सोशल मिडियावर एलआयसीच्या नावाखाली एक संदेश शेअर केला जात आहे. यामध्ये पॉलिसी धारकांना त्यांच्या पॉलिसीला आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितले जात आहे. यासाठी या पोस्टामध्ये विमा पॉलिसीला लिंक करण्यासाठी एका क्रमांकावर एसएमएस करण्यास सांगितला जात आहे. कंपनीने आपल्या नोटिशीत असे देखील म्हटले आहे की कंपनीकडून अशा प्रकारचा कुठलाही संदेश जारी करण्यात आलेला नाही.
No comments:
Post a Comment