Tuesday, 28 November 2017

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, ४५ विमान उड्डाने रद्द

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, ४५ विमान उड्डाने रद्द

इंडोनेशियामधील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या बालीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार हजार मीटर उंचीएवढा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू आहे. याप्रकारामुळे डेनपसार विमानतळावरून होणारी ४५ विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला अडथळा जाणवत आहे. यामुळे पाच हजार पेक्षा जास्‍त पर्यटक बालीमध्ये अडकले आहेत. या परिसरात १२० ज्वालामुखींचा सौम्‍य उद्रेक सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.इंडोनेशियातील राष्ट्रीय अपत्ती निवारण समितीने म्हटले आहे की, अंगुग पर्वतावर शनिवारी तीन वेळा ज्वालामुखीची आग भडकली. आगीच्या ज्वाळा सुमारे 4,000 मीटर उंचीपर्यंत पोहोचत होत्या. समितीने म्हटले आहे की, ज्वालामुखीचा पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार सकाळी4.30 च्या सुमारास झाला.


No comments:

Post a Comment