भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, अश्विनचा रेकॉर्ड
कोलकाता कसोटीत अंधुक प्रकाशामुळे विजयाची हुकलेली संधी भारताने नागपूरमध्ये साधली. नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने लंकेवर एक डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक (213) आणि मुरली विजय(128), चेतेश्वर पुजारा (143) आणि रोहित शर्मा (102 नाबाद) तिघांनी केलेली शतकी खेळी हे या सामन्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट ठरले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. लंकेचा शेवटचा गडी बाद करत आर. अश्विनने कसोटीमध्ये ३०० बळी पूर्ण केले. कमी कसोटी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विश्वविक्रम अश्विनने आपल्या नावावर केला. त्याने ५४ कसोटी सामन्यांत ३०० बळी घेतले. यापूर्वी कमी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीच्या नावावर होता.
No comments:
Post a Comment