दारूच्या दुकानाला देता येणार नाही महापुरुषांचे नाव
महापुरुष, देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव राज्यातील कोणत्याही दारुच्या दुकानाला देता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. मार्चमध्ये विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे कोणत्याही दारूच्या दुकानाला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. राज्यातील बिअर बार, दारुचे दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच गडकिल्यांची नावे दिल्याचे दिसते, हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे त्यांनी म्हटले होते. देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
No comments:
Post a Comment