प्रद्युम्न हत्या : अनेक पोलिससीबीआयच्या रडारवर

गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थीप्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणात आणखी एक बाब उघडझाली आहे. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुग्राम पोलिसांकडून या प्रकरणातील पुरावे लपवण्यातआले आहेत. त्यामुळे अनेक पोलिस सीबीआयच्यारडारवर आहेत. यापुर्वीही सीबीआयने अनेक खुलासे केलेआहेत. प्रद्युम्नची हत्या स्कुल बस कंडक्टर अशोककुमारने केल्याचे गुरुग्राम पोलिसांनी म्हटले होते. मात्र, गुरुग्राम पोलिसांनीच प्रद्युम्न हत्या प्रकरणाचा छडा काहीतासांतच लावण्यासाठी बस कंडक्टर अशोककुमारलाखूनी बनवल्याचे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयच्यातपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीबीआयचा अनेकपोलिसांवर संशय असून काही पोलिसांचे कॉल रेकार्डतपासण्यात येत आहेत. त्यांच्या विरोधातही कारवाईकेली जाण्याची शक्यता आहे. काही पोलिसांना अटकहीहोऊ शकते, असे सीबीआयच्या सूत्रांकडून समजते.
No comments:
Post a Comment