Wednesday, 29 November 2017

सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावती' विरोधकांना फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावती' विरोधकांना फटकारले

एकाच महिन्यात तिसऱ्यांदा ‘पद्मावती’ सिनेमाची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच ‘जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्ती सिनेमा न पाहताच यावर भाष्य का करत आहेत, या जबाबदार व्यक्तींनी अशी वक्तव्ये करणे बंद करावे’ अशी फटकारही  गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतर संघटनांना लगावली आहे. ‘पद्मावती सिनेमा सीबीएफसीकडे असताना जबबादार व्यक्तींनी कोणतीही चूकीची प्रतिक्रीया देऊ नये. काम कसे करायचे हे सेस्नॉर बोर्डाला कोणी सांगू शकत नाही’ असेही सुप्रिम कोर्टाने सुनावले. अनेक राजकीय नेते कलाकरांना धमक्या देत आहेत. याच वक्तव्यांचा परिणाम सेन्सॉर बोर्डाच्या मनात पक्षपात निर्माण करत आहेत. तरीही लोकांनी अशी वक्तव्ये केली तर ते लोक कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. असेही सुप्रिम कोर्टाने म्हटले.


No comments:

Post a Comment