Tuesday, 7 November 2017

काळ्या पैशांची पॅराडाईज पेपर्सनावाची यादी

काळ्या पैशांची पॅराडाईज पेपर्सनावाची यादी

जर्मनीतील 'सुददॉइश झायटुंग' या वृत्तपत्रानं काळापैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केलेला आहे. यावृत्तपत्रानं 'पॅराडाइज पेपर्स' उजेडात आणले आहेत. याचवृत्तपत्रानं 18 महिन्यांपूर्वी पनामा पेपर्ससंदर्भात खुलासाकेला होता. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 96नामांकित माध्यम समूहांनी मिळून 'पॅराडाइज पेपर्स'चाखुलासा करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.पॅराडाइज पेपर्समध्ये 1.34 कोटी दस्तऐवजांचा समावेशआहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोरआली आहे, ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणिसामर्थ्यशाली मंडळी आपला पैसा परदेशातपाठवण्यासाठी वापर करत होते. 
'पॅराडाइज पेपर्स'मध्येभारतातील 714 जणांचा समावेश आहे. यादीमध्येजगभरातील एकूण 180 देशांच्या नावाचा समावेश आहे.यामध्ये भारत 19व्या क्रमांकावर असल्याची माहितीसमोर आली आहे. नागरी हवाई राज्यमंत्री जयंत सिन्हा,बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, विजय माल्या, नीराराडिया, संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्यासारख्याख्यातनाम मंडळींचा यात समावेश आहे. अमिताभ बच्चनयांचे बर्म्युडामधील एका कंपनीत समभाग असल्याचाधक्कादायक खुलासाही झाला आहे.


No comments:

Post a Comment