Tuesday, 14 November 2017

अशोक खेमका यांची ५१वी बदली

अशोक खेमका यांची ५१वी बदली


हरियाणाचे आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनापुन्‍हा एकदा बदलीला सामोरे जावे लागले आहे. केंद्रसरकारने यावेळी त्यांची सामाजिक न्याय विभागातूनक्रीडा व युवा कल्याण विभागाचे मुख्य सचिव पदावरबदली केली आहे. अशोक खेमका यांची ५१ व्या वेळीबदली झाल्यानंतर त्यांनी ट्‍विट करुन रोष व्यक्त केले.सरकारने रविवारी खेमका यांच्यासहित तेरा आयएएसअधिकाऱ्यांची नियुक्ती तसेचे बदलीचे आदेश दिले आहेत. अशोक खेमका हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारीआहेत. त्यांच्या आतापर्यंत ५० वेळा बदल्या झाल्याआहेत. भ्रष्टाचाराविरोधात अनेकदा त्यांनी आवाजउठवला असल्याची त्यांची छाप आहे. मात्र प्रामाणिकशासन अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवण्याचा पुरेपूरप्रयत्न शासनाकडून होत असल्याचे चित्र दिसत आहे.


No comments:

Post a Comment