२०१९ मध्ये शरद पवार होऊ शकतातपंतप्रधान

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय शिबिर कर्जतमध्ये सुरूअसून या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल येत्याकाळात शरद पवार देशाचं पंतप्रधान होणे अशक्यनसल्याचे आश्वासक विधान केले आहे. भाजपसाठीयंदाची गुजरात विधानसभा निवडणुक कठीण झाल्याचेवक्तव्यही प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. नरेंद्र मोदींवरयाच सभेत प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार हल्ला केला. नोटबंदी, जीएसटीमुळे देशातील वातावरण बदलले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झाले आहे. भाजपचीपरिस्थिती गुजरातमध्ये कठीण होऊन बसली आहे. देशातएकेकाळी मोदींची लाट होती, पण तसे चित्र आताराहिलेले नाही, असे पटेल म्हणाले. तसेच शरद पवारआणि नरेंद्र मोदींची तुलना केली असता शेतकरी शरदपवारांना प्राधान्य देतील असेही त्यांनी म्हटले आहे. तसेचगुजरात मॉडेल राज्य म्हणून दाखवतात पण त्याचगुजरातमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईटअसल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे तसेच राष्ट्रवादीलापुढच्या काळात भरपूर मेहनत घ्यावी लागणारअसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या शिबिरात उद्याशरद पवारांचे भाषण होणार आहे. राष्ट्रवादीतील मरगळया शिबिरामुळे तरी झटकली जाईल, अशी आशा पक्षनेतृत्वाला आहे.
No comments:
Post a Comment