Wednesday, 8 November 2017

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वळण

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वळण

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबीराप्रसंगीमंगळवारी शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजरणाबाबतमोठा खुलासा केला. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काहीदिवसांपूर्वी भेट घेतली असल्याच्या बातमीला दुजोरा देतशरद पवार यांनी उद्धव ठाकरे भाजपवर नाराजअसल्याचे जाहीर केले. तसेच जर शिव सेना भाजपचापाठिंबा काढून घेत असेल तर राष्ट्रवादी सुद्धा भाजपाचीसाथ देणार नसल्याचा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरेयांना शरद पवारांनी 'तुम्ही आधी तुमचे पाऊल उचलाआम्ही आमचे काम नक्की करू' असा दिलासा दिलाआहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनीशरद पवार हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्य मंत्री होणारअसल्याची घोषणा केली होती. मात्र शरद पवार यांनी हेसाफ फेटाळून लावत सध्या राज्याचे राजकारण वेगळेवळण घेत असून माझ्या मुख्यमंत्री पदाबाबतचे स्वप्नबघणे सोडून द्यावे असे सांगितले. तसेच सेना-राष्ट्रवादीच्या या भेटीच्या खुलास्यानंतर भाजपचे मुख्यप्रवक्ते माधव भंडारी यांनी ही भेट दोन वैफ़ल्यग्रस्तांचीभेट असल्याचे मत व्यक्त केले. एकीकडे मुख्यमंत्रीफडणवीस शरद पवारांचे कौतुक करत थांबत नाहीत तरदुसरीकडे उद्धव ठाकरे सुद्धा मदतीसाठी त्यांच्याकडेचधाव घेत आहेत. म्हणजेच पुन्हा एकदा शरद पवारमहाराष्ट्राच्या राजकारणाचे सूत्रधार बनले असल्याचे चित्रआहेत.

No comments:

Post a Comment