प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्राची सुरुवातमंत्रालयातून

प्लॅस्टिकचा वापर कमी करून प्लॅस्टिकमुळे होणाऱ्याकचऱ्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं सुरुवातस्वतःपासून केली आहे. यापुढे मंत्रालयात प्लॅस्टिकबाटली वापरता येणार नाही. त्याशिवाय सर्व शासकीयकार्यालयात प्लॅस्टिक बाटली आणि पिशव्यांवर बंदीआणली आहे. मंत्रालयात झालेल्या पर्यावरण विभागाच्याबैठकीत हा निर्णय घेतला आहे. पर्यावरण मंत्री रामदासकदम यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.दुधाच्या, तेलाच्या, औषधांच्या प्लॅस्टिक पिशव्यांना पर्यायउपलब्ध केले जाणार आहेत. महिला बचत गटांनाकापडी पिशव्या बनवण्यासाठी निधी देणार असल्याचंरामदास कदम म्हणाले. प्लॅस्टिक बंदी झाल्यानंतरही यानिर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या दुकानदारांवरकारवाई करण्याची तरतूद असणार आहे. त्याअंतर्गत 3 ते6 महिन्यांची शिक्षा आणि दुकानाचा परवाना रद्दकरण्याचा प्रस्तावही राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. बंदीनंतर दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि पाण्याच्याबाटल्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचाअधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment