Saturday, 18 November 2017

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचे काम अंतिम टप्प्यात

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देण्याचे काम अंतिम टप्प्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरेंच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतल्या महापौर बंगल्यामध्ये करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याआधी कुटुंबियांसह बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. शिवतीर्थावर शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील दिग्गज नेते आले होते.


No comments:

Post a Comment