Friday, 24 November 2017

पुढील तीन दिवसही पावसाचे वातावरण

पुढील तीन दिवसही पावसाचे वातावरण

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस पडत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे ऐन थंडीत राज्यातील नागरिकांना शुक्रवारपर्यंत (दि. 24) अवेळी येणार्‍या पावसाला सामोरे जावे लागणार आहे. हवेच्या वरच्या थरातील चक्रीवादळ कर्नाटक राज्यात निर्माण झाले असल्याने सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्याच्या जोडीला दक्षिण-पश्‍चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवे क्षेत्र सोमवारी (दि. 27) निर्माण होत असल्याने सोमवारनंतर पुन्हा एकदा पाऊस पडेल, असे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. सध्या अरबी समुद्रातून राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. या स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मंगळवारी पाऊस पडला. तर उर्वरित राज्यात कोरडे वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी पळाली असून दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment