Tuesday, 14 November 2017

इराकइराण सीमेवर भूकंप; ३२८ठार, २५०० जखमी

इराकइराण सीमेवर भूकंप; ३२८ठार, २५०० जखमी


इराण आणि इराकच्या सीमाभागात रिश्टर स्केलवर ७.३तीव्रतेच्या भूकंपाने किमान ३२८ जणांचा मृत्यू झालाआहे. तर जवळ जवळ २५०० लोक यात जखमी झालेअसून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतआहे. अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार याभूकंपाचा केंद्रबिंदू इराकइराण सीमेजवळच्याहलाज्बापासून ३० किलोमीटर दूर तर जमिनीखाली ३३.९किलोमीटर खोलवर होता. संयुक्त राष्ट्रानुसार याकेंद्रबिंदूभोवतालच्या १०० किमी परिघात जवळजवळ१८ लाख लोक राहतात. तुर्कस्तान, इस्राईल आणि कुवैतया शेजारी देशांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. मृतांपैकी बहुतांश जण ईराणच्या कर्मनशाह प्रदेशातलेहोते. एका आपातकालीन सेवा अधिकाऱ्यानुसार फक्तईराणमध्येच २५०० लोक जखमी झाले आहेत.


No comments:

Post a Comment