देशभरातील शेतकऱ्यांचे २० नोव्हेंबररोजी आंदोलन

देशभरातील शेतकरी संघटना २० नोव्हेंबर रोजीराजधानी दिल्लीत एकत्र जमणार आहेत. या आंदोलनातअखिल भारतीय किसान संघर्ष समितीसह देशभरातील१८० शेतकरी संघटना सहभागी होणार असल्यामुळेदिल्लीत या आंदोलनाच्या दिवशी लाखभर शेतकरीजमतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.देशातील शेतकरी सरकारवर गेल्या काही महिन्यांमध्येकर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावरून नाराजआहेत. अनेक ठिकाणी त्यासाठी आंदोलनेही करण्यातआली होती. यामध्ये पोलिसांनी मध्य प्रदेशच्या मंदसौरयेथे शेतकरी आंदोलनादरम्यान जमावाला पांगवण्यासाठीकेलेल्या गोळीबारात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने या घटनेविरुद्धवातावरणनिर्मिती करण्यासाठी देशभरात १० हजारकिलोमीटरची पदयात्रा काढली होती. दिल्लीत यापदयात्रेची सांगता होत असल्याच्या पार्श्वभूमीवर २०नोव्हेंबरला हे निर्णयाक आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शेतकरीहीसहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment