Friday, 10 November 2017

शिवसेना गुजरात निवडणूक लढणार

शिवसेना गुजरात निवडणूक लढणार


गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे यापूर्वीशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.पण आता शिवसेना गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआखाड्यात उतरणार असल्यामुळे महाराष्ट्रात एकत्र सत्ताचालवणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये दरी आणखीवाढण्याची दाट शक्यता आहे. सेनेच्या गुजरातमध्येविधानसभा लढविण्याच्या निर्णयामुळे भाजपचीडोकेदुखी वाढणार यात शंकाच नाही. गुजरातविधानसभेच्या रिंगणात ४० पेक्षा जास्त जागांवरशिवसेना आपले उमेदवार उभे करणार आहे. यापूर्वीशिवसेनेमुळे बिहारमध्ये भाजपच्या मतांमध्ये मोठी घटझाली होती. त्यामुळे आता गुजरातमध्येही शिवसेनेमुळेहिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते. त्याचा थेट परिणामभाजपच्या मतांवर होणार आहे.


No comments:

Post a Comment