Friday, 10 November 2017

प्रदूषणामुळे दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन

प्रदूषणामुळे दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन


तिसर्‍या दिवशीही राजधानी दिल्लीत हवा प्रदुषणाचीस्थिती अतिउच्च पातळीवर पोहचल्याने दिल्लीत प्रदुषणआणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातट्रकसारख्या वाहनांसहित बांधकाम साहित्य आणण्यासबंदी घालण्यात आली आहे. फक्त जीवनावश्यक वस्तूंचीने-आण करणाऱ्या ट्रकांना दिल्लीत प्रवेश दिला जातआहे. वाहनांचा 'सम-विषम' फॉर्म्युला १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान सुरू करण्यात येणार आहे. पहिल्यांदादिल्लीमध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी आणि दुसऱ्यांना१५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान ऑड-इव्हन पॅटर्न लागूकरण्यात आला होता. दुचाकी वाहनांना या ऑड-इव्हनपॅटर्नच्या नियमांमधून वगळण्यात येणार आहे. मागीलदोन वेळेसही दुचाकी वाहनांना या नियमांमधून सवलतदेण्यात आली होती.


No comments:

Post a Comment