Tuesday, 21 November 2017

कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारी युक्तिवाद

कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारी युक्तिवाद

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणातील तिसरा दोषी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या वतीने अ‍ॅड़ प्रकाश आहेर हे प्रथम युक्तिवाद करणार आहेत. कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याला १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे, तसेच पोक्सो कायद्याखाली दोषी धरण्यात आले. कायद्यातील या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.


No comments:

Post a Comment