राकेश अस्थाना सीबीआय विशेष संचालकपदी कायम

काही दिवसांपासून राकेश अस्थाना यांच्या सीबीआय विशेष संचालकपदावरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने आज मंगळवार दि. २८ रोजी फेटाळली. त्यामुळे राकेश अस्थाना सीबीआय विशेष संचालकपदी कायम राहणार आहेत. अस्थाना यांची सीबीआय विशेष संचालक पदावरुन नियुक्ती रद्द करावी, या मागणीची याचिका कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. न्यायालयाने अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने वकील भूषण यांचा युक्तीवाद फेटाळत राकेश अस्थाना यांचे सीबीआय विशेष संचालक पद राहणार असल्याचा निकाल दिला.
No comments:
Post a Comment