दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक पातळी
दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक पातळी लक्षात घेताइंडियन मेडिकल असोसिएशनने मंगळवारी आरोग्यआणीबाणी जाहीर केली. या आणीबाणीच्या अंतर्गतलोकांना अत्यावश्यक असल्याशिवाय घराबाहेर नपाडण्याचा सल्ला दिला. तसेच बुधवारी दिल्लीतील सर्वशाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दिल्ली हायकोर्टानेगाडी पार्किंगचे दर देखील वाढविले आहेत. संपूर्णराज्यात प्रदूषणाचे धुके झाल्यामुळे अनेक फ्लाईट्सदेखील रद्द झाल्या व जवळ जवळ सगळ्याच फ्लाईट्सउशिरा होत्या. दर वर्षी या वेळात दिल्लीतील प्रदूषणाचीपातळी वाढतेच मात्र यंदा ही पातळी अत्यंत धोकादायकझाली असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने घोषितकेले. प्रदूषणाच्या बाबतीत भारताची राजधानी दिल्लीजगात पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्ली सरकारकडूनयासाठी बरीच प्रयत्न केली जातात मात्र तरीसुद्धा यातकोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही.

No comments:
Post a Comment