Tuesday, 7 November 2017

निर्मला सीतारमन यांच्या दौऱ्याला चीनचा आक्षेप

निर्मला सीतारमन यांच्या दौऱ्याला चीनचा आक्षेप


सुरक्षा मंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी अरुणाचलप्रदेशच्‍या विवादित क्षेत्राचा दौरा केल्‍यानंतर चीननेत्‍यावर आक्षेप घेतला आहे. सीतारमन यांनी रविवारी  अरुणाचल प्रदेशच्‍या सुदूर अंजा जिल्‍ह्‍याचा दौरा केलाहोता. हा जिल्‍हा  चीनच्‍या सीमेलगत आहे. भारताच्‍यासुरक्षामंत्र्यांनी शांतीसाठी या विवादित भागाचा दौराकरणे अनुकूल नाही, असे चीनने म्‍हटले आहे. चीनचेपरराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते चुनयिंग यांनी सोमवारीप्रसारमाध्‍यमांशी बोलताना म्‍हटले, 'चीन आणिभारतामध्‍ये अरुणाचलच्‍या संबंधित प्रदेशावरुन वादआहे. अशातच शांतीसाठी सुरक्षामंत्र्यांचा दौरा अनुकूलनाही. या दौर्‍यामुळे विवादित भागात अस्‍थिरता निर्माणहोऊ शकते. शांतीसाठी दोन्‍ही देशांनी एकत्र येणेआवश्‍यक आहे.' सीतारमन यांच्‍यासोबत जनरलऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्‍टनंट जनरल अभयकृष्णा आणि लष्‍कराचे इतर वरीष्‍ठ अधिकारी होते. यावेळी सीतारमण यांनी जवानांशी चर्चा करुनसीमेलगतच्‍या परिस्‍थितीचा आढावाही घेतला.


No comments:

Post a Comment