अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून योग्यपद्धतीने तपास होत नसल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा अनिकेतच्या दोन भावांनी प्रयत्न केला. मंगळवारी सांगली शहर पोलीस ठाण्याबाहेर अनिकेतचे भाऊ अमित आणि आशिष कोथळे या दोघांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांना ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखले आणि पुढील अनर्थ टळला. शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे या तरुणाला जबरी चोरी प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. अनिकेतला पोलिसांनी चौकशी दरम्यान बेदम मारहाण केली आणि अनिकेतचा या मारहाणीत मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि अन्य पाच पोलिसांनी हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोलीतील जंगलात नेऊन जाळला होता.
No comments:
Post a Comment