Wednesday, 29 November 2017

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न

अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न 

सांगलीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करण्यात येत असून योग्यपद्धतीने तपास होत नसल्याचा आरोप करत पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा अनिकेतच्या दोन भावांनी प्रयत्न केला. मंगळवारी सांगली शहर पोलीस ठाण्याबाहेर अनिकेतचे भाऊ अमित आणि आशिष कोथळे या दोघांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. दोघांना ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच रोखले आणि पुढील अनर्थ टळला. शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे या तरुणाला जबरी चोरी प्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. अनिकेतला पोलिसांनी चौकशी दरम्यान बेदम मारहाण केली आणि अनिकेतचा या मारहाणीत मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि अन्य पाच पोलिसांनी हे प्रकरण अंगलट येऊ नये यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोलीतील जंगलात नेऊन जाळला होता.


सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावती' विरोधकांना फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने 'पद्मावती' विरोधकांना फटकारले

एकाच महिन्यात तिसऱ्यांदा ‘पद्मावती’ सिनेमाची याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच ‘जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्ती सिनेमा न पाहताच यावर भाष्य का करत आहेत, या जबाबदार व्यक्तींनी अशी वक्तव्ये करणे बंद करावे’ अशी फटकारही  गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतर संघटनांना लगावली आहे. ‘पद्मावती सिनेमा सीबीएफसीकडे असताना जबबादार व्यक्तींनी कोणतीही चूकीची प्रतिक्रीया देऊ नये. काम कसे करायचे हे सेस्नॉर बोर्डाला कोणी सांगू शकत नाही’ असेही सुप्रिम कोर्टाने सुनावले. अनेक राजकीय नेते कलाकरांना धमक्या देत आहेत. याच वक्तव्यांचा परिणाम सेन्सॉर बोर्डाच्या मनात पक्षपात निर्माण करत आहेत. तरीही लोकांनी अशी वक्तव्ये केली तर ते लोक कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. असेही सुप्रिम कोर्टाने म्हटले.


हाफिज सईदची संयुक्त राष्ट्राकडे दहशतवादी यादीतून नाव वगळण्याची मागणी

हाफिज सईदची संयुक्त राष्ट्राकडे दहशतवादी यादीतून नाव वगळण्याची मागणी

दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव हटवण्यात यावे अशी मागणी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदने संयुक्त राष्ट्राकडे केली आहे. आपले नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्यात यावे यासाठी संयुक्त राष्ट्राकडे हाफिज सईदने याचिका दाखल केली आहे. लाहोरमधील एका लॉ फर्मच्या माध्यमातून हाफिज सईदने ही याचिका पाठवली आहे. ही याचिका हाफिज सईद नजरकैदेत होता तेव्हा करण्यात आली. हाफिज सईदला संयुक्त राष्ट्राने मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर डिसेंबर २००८ रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. एकूण १६६ जणांचा मृत्यू मुंबई दहशतवादी हल्ल्यात झाला होता. हाफिज सईदवर दहशतवादी कारवायांबद्दल १० दशलक्ष डॉलरचे बक्षिस आहे. पाकिस्तानने गेल्याच आठवड्यात २९७ दिवसानंतर हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका केली आहे.


एलआयसी ‘आधार’शी लिंक करण्याच्या नावाने फसवणूक

एलआयसी ‘आधार’शी लिंक करण्याच्या नावाने फसवणूक

मोबाइल नंबर आणि बँक खाती जोडण्याव्यतिरिक्त, आता इन्शुरन्स पॉलिसीला आधार कार्डशी जोडणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत त्यासाठी देण्यात आली आहे. परंतु या अत्यावश्यकपणाच्या पार्श्वभूमीवर काही लोकांनी फसवणूक सुरु केली आहे. या संदर्भात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) ने आपल्या वेबसाइटवर याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की एलआयसी पॉलिसीला आधार लिंक करण्याच्या नावाखाली फसवणूक होत आहे. सोशल मिडियावर एलआयसीच्या नावाखाली एक संदेश शेअर केला जात आहे. यामध्ये पॉलिसी धारकांना त्यांच्या पॉलिसीला आधार क्रमांकाशी जोडण्यास सांगितले जात आहे. यासाठी या पोस्टामध्ये विमा पॉलिसीला लिंक करण्यासाठी एका क्रमांकावर एसएमएस करण्यास सांगितला जात आहे. कंपनीने आपल्या नोटिशीत असे देखील म्हटले आहे की कंपनीकडून अशा प्रकारचा कुठलाही संदेश जारी करण्यात आलेला नाही.


राकेश अस्‍थाना सीबीआय विशेष संचालकपदी कायम

राकेश अस्‍थाना सीबीआय विशेष संचालकपदी कायम

काही दिवसांपासून राकेश अस्थाना यांच्‍या सीबीआय विशेष संचालकपदावरुन सुरु असलेला वाद अखेर मिटला आहे. सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने आज मंगळवार दि. २८ रोजी फेटाळली. त्‍यामुळे राकेश अस्‍थाना सीबीआय विशेष संचालकपदी कायम राहणार आहेत.  अस्‍थाना यांची सीबीआय विशेष संचालक पदावरुन नियुक्‍ती रद्द करावी, या मागणीची याचिका कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती. न्‍यायालयाने अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्‍पष्‍ट केले. न्‍यायालयाने वकील भूषण यांचा युक्‍तीवाद फेटाळत राकेश अस्‍थाना यांचे सीबीआय विशेष संचालक पद राहणार असल्‍याचा निकाल दिला.


Tuesday, 28 November 2017

दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्‍हर्स

दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्‍हर्स

मिस युनिव्‍हर्स २०१७ किताब दक्षिण अफ्रिकेची डेमी नेल पीटर्सला जाहीर करण्यात आला. डेमी नेल पीटर्सला २०१६ ची मिस युनिव्‍हर्स फ्रान्‍सची आयरिस मिट्टीनेएर हिने प्रदान केला. १९७८ मध्ये दक्षिण आफ्रिकेन मिस युनिव्‍हर्स जिंकला होता. डेमी नेल पीटर्सला ९३ प्रतिस्‍पर्धी उमेदवारांचे आव्‍हान होते. अंतिम फेरीसाठी फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने या स्‍पर्धेत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचे असलेली डेमी नेल पीटर्स व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन क्षेत्रातील पदवीधर आहे. दक्षिण आफ्रिकेला ३९ वर्षांनंतर हा किताब मिळाला आहे तसाच हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा किताब आहे.  यंदाच्या मिस युनिव्‍हर्स २०१७ साठी भारताच्या श्रध्दा शशीधरने प्रतिनिधीत्‍व केले होते. श्रद्धा ‘यामाहा फॅसिनो मिस दीवा २०१७’ची विजेती आहे.


गुजरातमध्ये एका मतदारासाठी गीरच्या जंगलात मतदान केंद्र

गुजरातमध्ये एका मतदारासाठी गीरच्या जंगलात मतदान केंद्र

विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची समस्या न येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोग महिला, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करत आहे. या संबंधात, सोमनाथ जिल्ह्यातील बनईज गावात केवळ एक मतदाराला मत देण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्र उभारणार आहे. बानेज गाव गीर जंगलामध्ये एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. गावात बनेश्वर महादेव मंदिरचे एक पुजारी महंत भारतदास गुरु दर्शन असून, जे बानेज गावातील एकमेव मतदार आहेत. केवळ एका मतदारासाठी २००२पासून निवडणूक आयोग मतदान केंद्र उभारत आहे. या वेळी ५ निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी येथे एका दिवसासाठी तैनात केले जातील, जेणेकरुन महंत भारतदास आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील.


इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, ४५ विमान उड्डाने रद्द

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, ४५ विमान उड्डाने रद्द

इंडोनेशियामधील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या बालीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार हजार मीटर उंचीएवढा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू आहे. याप्रकारामुळे डेनपसार विमानतळावरून होणारी ४५ विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला अडथळा जाणवत आहे. यामुळे पाच हजार पेक्षा जास्‍त पर्यटक बालीमध्ये अडकले आहेत. या परिसरात १२० ज्वालामुखींचा सौम्‍य उद्रेक सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.इंडोनेशियातील राष्ट्रीय अपत्ती निवारण समितीने म्हटले आहे की, अंगुग पर्वतावर शनिवारी तीन वेळा ज्वालामुखीची आग भडकली. आगीच्या ज्वाळा सुमारे 4,000 मीटर उंचीपर्यंत पोहोचत होत्या. समितीने म्हटले आहे की, ज्वालामुखीचा पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार सकाळी4.30 च्या सुमारास झाला.


मी फक्त चहा विकला देश विकला नाही - नरेंद्र मोदी

मी फक्त चहा विकला देश विकला नाही - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सोमवार पासून गुजरात निवडणुकांसाठी प्रचाराला सुरूवात केली. सोमवारी त्यांनी गुजरातमध्ये चार सभा केल्या. यावेळी काँग्रेसपक्षाकडून झालेल्या प्रत्येक टीकेचे उत्तर त्यांनी दिले.  भुजमधल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातच्या मुलावर गुजरातमध्ये येऊनच खोटे आरोप करणाऱ्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही असे मोदी म्हणाले. तसेच सरदार पटेल यांच्या काळात काँग्रेसनं गुजरातवर दुजाभाव केला. त्यावेळच्या जनतेनं ते सहन केलं. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज तुम्ही असा अपमान सहन कराल का असा प्रश्न यावेळी मोदींनी केला. 'माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला, देश विकलेला नाही', असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.


भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, अश्विनचा रेकॉर्ड

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, अश्विनचा रेकॉर्ड

कोलकाता कसोटीत अंधुक प्रकाशामुळे विजयाची हुकलेली संधी भारताने नागपूरमध्ये साधली. नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने लंकेवर एक डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक (213) आणि  मुरली विजय(128), चेतेश्‍वर पुजारा (143)  आणि रोहित शर्मा (102 नाबाद)  तिघांनी केलेली शतकी खेळी हे या सामन्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट ठरले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. लंकेचा शेवटचा गडी बाद करत आर. अश्विनने कसोटीमध्ये ३०० बळी पूर्ण केले. कमी कसोटी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विश्वविक्रम अश्विनने आपल्या नावावर केला. त्याने ५४ कसोटी सामन्यांत ३०० बळी घेतले. यापूर्वी कमी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीच्या नावावर होता.


Monday, 27 November 2017

रिहा हो जाएगा 26/11 हमले का मास्टरमाइंड आतंकी हाफिज सईद

रिहा हो जाएगा 26/11 हमले का मास्टरमाइंड आतंकी हाफिज सईद 

पाक के पंजाब प्रांत के न्यायिक समीक्षा बोर्ड ने मुंबई हमले के मास्टरमाइंड और जमात-उद-दावा के सरगना हाफिड सईद को नजरबंदी से रिहा करने का आदेश दिया है। यह मुंबई हमले को लेकर सईद को न्याय के कटघरे में खड़ा करने के भारत के प्रयासों के लिए झटका है। सईद इस साल जनवरी से नजरबंद था। नजरबंदी की मियाद को तीन महीने बढ़ाने के सरकार के आग्रह को खारिज करते हुए बोर्ड ने बुधवार को सईद की रिहाई का आदेश दिया। आदेश के अनुसार नजरबंदी की 30 दिनों की मियाद खत्म होते ही सईद को रिहा कर दिया जाएगा। यह मियाद अगले कुछ दिनों में खत्म होने वाली है। जमात-उद-दावा के ट्विटर पर जारी अकाउंट पर सईद ने एक छोटे वीडियो में कहा, 'मेरे खिलाफ भारत की सभी कोशिशें नाकाम हुईं और मैं रिहा हो गया।'


आरक्षण पर कांग्रेस ने मानी बात: हार्दिक पटेल

आरक्षण पर कांग्रेस ने मानी बात: हार्दिक पटेल

गुजरात में पाटीदार नेता हार्दिक पटेल कांग्रेस का समर्थन करेंगे। बुधवार को इसको लेकर लगाई जा रहीं सभी अटकलों पर विराम लगाते हुए अब हार्दिक ने साफ कर दिया है कि वो कांग्रेस का समर्थन करेंगे। कांग्रेस से समर्थन पर हार्दिक पटेल ने कहा कि हम खुलेतौर पर कांग्रेस का समर्थन नहीं कर रहे हैं। लेकिन हम बीजेपी के खिलाफ लड़ेंगे। ऐसे में प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष तौर पर कांग्रेस को समर्थन रहेगा। आरक्षण को लेकर कांग्रेस से लगातार बातचीत जारी है। कांग्रेस ने आरक्षण पर हमारी मांग मान ली है। उन्होंने कहा, कांग्रेस सत्ता में आने पर आयोग बनाएगी। इसके साथ ही उन्होंने कहा कि कांग्रेस सरकार बनाने का प्रस्ताव पेश करेगी। मैं किसी दल में नहीं जाऊंगा। पाटीदार आरक्षण कांग्रेस के घोषणापत्र में होगा। कांग्रेस का फॉर्मूला हमे मंजूर है।


160 किलोमीटर तक गलत पटरी पर दौड़ी ट्रेन, यात्रियों के बताने पर बदला ट्रैक

160 किलोमीटर तक गलत पटरी पर दौड़ी ट्रेन, यात्रियों के बताने पर बदला ट्रैक

रेलवे की बड़ी चूक के चलते बुधवार को स्पेशल ट्रेन गलत ट्रैक पर चली गई। रेलवे को करीब 160 किलोमीटर बाद अपनी गलती का अहसास हुआ, जिसके बाद ट्रेन को रिवर्स लेकर सही ट्रैक पर लाया गया। दरअसल, दिल्ली से कोल्हापुर जा रही स्पेशल ट्रेन रेलवे अफसरों ने गलती से मथुरा से ग्वालियर ट्रैक पर रवाना कर दिया। जबकि इस ट्रेन को कोटा-रतलाम के रास्ते जाना था। स्पेशल ट्रेन के यात्रियों को जब इसका पता चला तो उन्होंने बानमोर स्टेशन के पास हंगामा कर दिया। मौके पर पहुंची पुलिस ने यात्रियों को समझाया, उसके बाद ट्रेन ग्वालियर के रास्ते कोल्हापुर के लिए रवाना हुई। स्पेशल ट्रेन के गलत ट्रैक पर आने से अन्य ट्रेनें भी प्रभावित हुई। आगरा-ग्वालियर फास्ट पैसेंजर भी एक घंटे की देरी से ग्वालियर स्टेशन पहुंची।

Sunday, 26 November 2017

रंगे और लिखे हुए नोट लेने से मना नहीं कर सकेंगे बैंक

रंगे और लिखे हुए नोट लेने से मना नहीं कर सकेंगे बैंक

अब बैंक किसी भी ऐसे नोट को लेने से मना नहीं कर पाएंगे जिस पर कुछ लिखा है या फिर रंग लगा हुआ है। न्यूज 18 हिंदी की एक रिपोर्ट के मुताबिक भारतीय रिजर्ब बैंक ने सभी बैंकों को स्पष्ट तौर पर यह कहा है कि अगर ऐसी शिकायत मिली कि बैंक ऐसे नोट नहीं ले रहे हैं तो उन पर 10 हजार रुपये तक का जुर्माना लगाया जा सकता है। रिजर्व बैंक ने यह भी साफ किया कि कोई भी व्‍यक्ति इस तरह के नोट को बैंक से बदल नहीं सकता लेकिन वो चाहे तो ऐसे नोट को अपने बैंक खाते में जमा कर सकता है। बैंकों की तरफ से उसे इसकी छूट होगी। दिल्‍ली में चल रहे अंतर्राष्‍ट्रीय व्‍यापार मेले के हॉल नंबर 18 में आर्थिक साक्षरता के तरह रिजर्व बैंक ऑफ इंडिया लोगों को जागरुक कर रहा है। यहां  लोगों के सवालों का जवाब देते हुए रिजर्व बैंक ने कहा कि अगर किसी नोट पर कुछ लिखा है तो वह अवैध मुद्रा की श्रेणी में नहीं आता। कोई भी बैंक इस तरह के नोटों को लेने से इनकार नहीं कर सकता।


पीएम ने लॉन्च किया ऐसा ऐप जो करेगा आपके 100 से ज्यादा काम

पीएम ने लॉन्च किया ऐसा ऐप जो करेगा आपके 100 से ज्यादा काम

सरकारी सेवाओं तक पहुंच आसान बनाने के लिए पीएम मोदी ने UMANG ऐप लॉन्च किया है। न्यू एज गवर्नेंस के लिए UMANG या यूनिफाइड मोबाइल एप्लीकेशन की घोषणा 2016 में की गई थी और इसे पहले पिछले साल दिसंबर में लॉन्च किया जाना था। हालांकि, कई बीटा टेस्ट के कारण इस मोबाइल एप्लीकेशन में देरी हुई। उमंग ऐप को मोबाइल में डाउनलोड करने के बाद आपको प्रोविडेंट फंड, नेशनल पेंशन सिस्टम (NPS) के डिटेल्स जानने, गैस सिलेंडर की बुकिंग कराने, नया पैन कार्ड बनवाने या पानी और बिजली का बिल जमा करने के लिए कहीं जाने की जरूरत नहीं है। इस एक ऐप की मदद से आप घर बैठे सारे काम कर सकते हैं। इस ऐप के जरिए आप एक ही जगह पर 100 से ज्यादा अलग-अलग सरकारी सेवाओं तक पहुंच बना सकते हैं।


पद्मावती: 'हम पुतले नहीं जलाते' नोट के साथ जयपुर किले लटका मिला शव

पद्मावती: 'हम पुतले नहीं जलाते' नोट के साथ जयपुर किले लटका मिला शव

संजय लीला भंसाली की फिल्म पद्मावती को लेकर जारी विवाद ने शुक्रवार को खूनी रूप ले लिया। राजस्थान की राजधानी जयपुर स्थित नाहरगढ़ किले पर एक शख्स की लाश लटकती हुई मिली। शव की पास दीवार पर 'पद्मावती' के विरोध में मैसेज भी लिखे हुए मिले। शव के पास लिखा था, 'हम पुतले नहीं जलाते, लटकाते हैं।' वहीं, दूसरे पत्थर पर लिखा है- 'पद्मावती का विरोध।' पुलिक के मुताबिक मृत व्यक्ति की पहचान चेतन सैनी के रूप में हुई है। पुलिस को उसकी जेब से मुंबई की एक फिल्म का टिकट भी मिला है। शव को किले से उतारकर पोस्टमॉर्टम के लिए भेज दिया गया। वहीं दिल्ली हाईकोर्ट ने 'पद्मावती' फिल्म पर बैन लगाने वाली याचिका खारिज कर दी है। हाईकोर्ट ने कहा कि इस तरह की याचिकाओं को लगाकर आप हिंसा को बढ़ावा दे रहे हैं।


S&P ने नहीं बढ़ाई रेटिंग, सरकार को झटका

S&P ने नहीं बढ़ाई रेटिंग, सरकार को झटका 

अंतरराष्ट्रीय क्रेडिंट रेटिंग एजेंसी स्टैंडर्ड एंड पुअर (S&P) ने भारत की वित्तीय साख को 'बीबीबी- त्रणात्मक' के स्तर पर बरकरार रखा है। इसे देश की वित्तीय साख में सुधार की सरकार की उम्मीदों को तड़का झटका माना जा रहा है। एजेंसी ने राजकोषीय स्थिति को कमजोर बताते हुए कहा है कि फिलहाल देश की साख को मौजूदा स्तर से ऊंचे स्तर पर नहीं रखा जा सकता है। एसएंडपी ने भारत की रेटिंग 2007 के जनवरी में बदलकर बीबीबी की थी, जो बांड्स के मामले में सबसे निचली निवेश रेटिंग है। एजेंसी ने हालांकि कहा है कि मोदी सरकार ने राजकोषीय स्थिति बेहतर करने के लिए उल्‍लेखनीय कदम उठाए हैं और इसलिए भारत का आउटलुक स्‍टेबल बना रहेगा।


टमाटर हुआ 'खट्टा', दिल्ली में भाव 80 रुपये किलो तक

टमाटर हुआ 'खट्टा', दिल्ली में भाव 80 रुपये किलो तक

दिल्ली में टमाटर का भाव खुदरा बाजार में 80 रुपये किलो तक पहुंच गया है। आपूर्ति में कमी के कारण टमाटर के दाम आसमान छूते जा रहे हैं। दिल्ली के अलावा देश के कई हिस्सों में भी टमाटर के दाम बढ़ चुके हैं। व्यापार आंकड़ों के अनुसार प्रमुख उत्पादक राज्य कर्नाटक के बेंगलुरु में टमाटर का खुदरा दाम 45 से 50 रुपये प्रति किलोग्राम तक पहुंच चुका है। मिजोरम की राजधानी आइजॉल में टमाटर 95 से 100 रुपये किलो बिक रहा है। फर्स्टपोस्ट हिंदी की एक रिपोर्ट के मुताबिक दिल्ली स्थित आजादपुर मंडी के टमाटर व्यापारी संघ के अध्यक्ष अशोक कौशिक ने बताया कि कर्नाटक और मध्य प्रदेश की हालिया बरसात की वजह से टमाटर की उपलब्धता कम हुई है। मध्य प्रदेश में टमाटर की 90 प्रतिशत फसल खराब हो चुकी है। किसानों ने फिर से बुवाई की है. इस फसल को आने में 15 से 20 दिन लगेंगे।


मिस्र: मस्जिद पर आतंकी हमले में 184 की मौत, 125 घायल

मिस्र: मस्जिद पर आतंकी हमले में 184 की मौत, 125 घायल

मिस्र के अशांत उत्तरी सिनाई इलाके में शुक्रवार को एक बड़ा आतंकी हमला हो गया। यह हमला एक मस्जिद के पास जुम्मे की नमाज के दौरान हुआ। इस आतंकी हमले में करीब 125 लोग घायल हो गए, जबकि 184 की मौत हो गई। अलआरिश में अल रॉवडा मस्जिद के समीप यह बम लगाया था जो नमाज के दौरान फट गया। सूत्रों ने एक समाचार एजेंसी को बताया कि विस्फोट के वहां से भाग रहे श्रद्धालुओं पर भी आतंकवादियों ने गोलीबारी की। अभी तक इस हमले की किसी भी आतंकी संगठन ने जिम्मेदारी नहीं ली है। मिस्र की सरकार ने तीन दिनों के राष्ट्रीय शोक का ऐलान किया है। राष्ट्रपति अब्दुल फतह अल सीसी इस घटना पर चर्चा के लिए अधिकारियों के साथ आपात बैठक करेंगे। मिस्र के उत्तरी सिनाई में जनवरी, 2011 से ही कई हिंसक हमले हुए हैं। जनवरी, 2011 में हुई क्रांति से राष्ट्रपति हुस्नी मुबारक की सत्ता चली गई थी।


पिछले जन्म के पाप का परिणाम है कैंसर: असम के स्वास्थ्य मंत्री

पिछले जन्म के पाप का परिणाम है कैंसर: असम के स्वास्थ्य मंत्री


असम के स्वास्थ्य मंत्री हेमंत शर्मा के मुताबिक कैंसर की बीमारी पुराने जन्म के पाप का परिणाम है। उन्होंने इसे दैवीय न्याय करार दिया। एक कार्यक्रम में असम के स्वास्थ्य मंत्री हेमंत बिस्व शर्मा ने कहा, 'जब हम पाप करते हैं तो भगवान हमें उसकी सजा देता है। कई बार इस तरह की खबरें सामने आती हैं कि किसी युवा को कैंसर हो गया या फिर कोई दुर्घटना का शिकार हो गया। अगर हम इन कारणों के पीछे जाएंगे तो पाएंगे कि दैवीय न्याय के कारण ऐसा हुआ है। कोई जरूरी नहीं है कि यह गलती हम खुद करें। कई बार संभव है कि शायद मेरे माता-पिता कोई गलती करें। कोई भी गलती करेगा तो दैवीय न्याय से बचा नहीं जा सकता। उसका परिणाम भुगतना पड़ता है। गीता और बाइबल में भी इसका जिक्र है।' उनके इस बयान पर कांग्रेसी नेता देबब्रत सैकिया ने कहा कि हेमंत का यह बयान दुर्भाग्यपूर्ण है और यह इस बीमारी से पीड़ितों की भावनाओं को ठोस पहुंचाने जैसा है।


संसद का शीतकालीन सत्र 15 दिसंबर से होगा शुरू: अरुण जेटली

संसद का शीतकालीन सत्र 15 दिसंबर से होगा शुरू: अरुण जेटली

केंद्रीय मंत्री अरुण जेटली ने बुधवार को बताया कि संसद का शीतकालीन सत्र 15 दिसंबर से शुरू होगा। यह बात उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में कही। मौजूदा नियमों के मुताबिक शीतकालीन सत्र बुलाने के लिए 15 दिनों का समय लगता है। जेटली ने कहा कि संसद सत्र और चुनाव की तारीखें एक दूसरे से न टकराएं इसलिए शीतकालीन सत्र में देरी हुई। उन्होंने साफ किया कि पहले भी ऐसे हालात में सत्र आगे बढ़ता रहा है। संसद के शीतकालीन सत्र को लेकर कांग्रेस के आरोपों को पूरी तरह से खारिज करते हुए जेटली ने कहा है कि सत्र को आगे बढ़ाने के बारे में कुछ भी अस्वाभाविक नहीं है। सूत्रों के अनुसार सत्र की औपचारिक घोषणा तब होगी जब कैबिनेट के समक्ष पेश किए गए दो अध्यादेश जारी हो जाएंगे। संसद सत्र की तिथि की घोषणा के बाद अध्यादेश जारी नहीं किया जा सकते हैं।

Friday, 24 November 2017

दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी

दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसच्या न्यायाधीशपदी

भारताचा संयुक्त राष्ट्रात मंगळवारी मोठा विजय झाला असून दलवीर भंडारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या शेवटच्या जागेसाठी दलवीर भंडारी आणि ब्रिटनच्या उमेदवारात लढत होणार होती. मात्र अखेरच्या क्षणी ब्रिटनने आपला उमेदवार मागे घेतल्याने दलवीर भंडारींचा विजय झाला. भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते. न्यू यॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मतं मिळाली, तर सुरक्षा परिषदेच्या सर्वच्या सर्व 15 सदस्यांनीही त्यांनाच मत दिलं. याआधी नाट्यक्रम घडामोडी घडल्या आणि ब्रिटनने निवडणूक पार पडण्याच्या काही क्षण आधीच आपली उमेदवारी मागे घेतली, ज्यामुळे दलवीर भंडारी यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

निरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांना २ लाखांची मदत

निरा–भिमा नदीजोड प्रकल्प अपघातातील मृतांना २ लाखांची मदत

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामधल्या अकोले इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत काम सुरु असलाना बोगद्याची क्रेन तुटून, सोमवारी संध्याकाळी आठ कामगारांचा मृत्यू झाला. यातील तीन कामगार उत्तरप्रदेशचे असून, आंध्रप्रदेश आणि ओरिसाचे प्रत्येकी दोन जण आहेत. तर एक कामगार इंदापूरचा आहे. गेल्या काही वर्षांपासून इथे नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचं काम सुरु आहे. या मृत झालेल्या कामगारांना शासनाकडून दोन रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी आपलं काम संपवून कामगार क्रेनच्या मदतीनं वर येत असताना क्रेन तुटून ही दुर्घटना घडली. कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक मृत तरुणाच्या नातेवाईकांनी केला  आह. तसेच यापूर्वीही या ठिकाणी दुर्घटना घडून अनेकांना अपंगत्व आल्याची तक्रारही त्यांनी केली.