Wednesday, 27 December 2017

अण्णा हजारेंनी केला थेट मोदींवर वार

अण्णा हजारेंनी केला थेट मोदींवर वार


भ्रष्टाचारमुक्त भारत निर्मितीचा संकल्प करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भ्रष्टाचारास प्रतिबंध करणारा कायदा कमजोर केला. तसेच निवडणुकीत दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यामुळे देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्‍वास उडाला आहे. देशातील जनताच आता ‘मन की बात’ बोलू लागली आहे. विविध राज्यांत घेतलेल्या सभांमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी; तसेच लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी हजारे हे येत्या 23 मार्चपासून नवी दिल्लीमध्ये बेमुदत आंदोलन  करणार आहेत.


No comments:

Post a Comment