Monday, 11 December 2017

अनुष्का आणि विराट कोहली अडकले विवाहबंधनात

अनुष्का आणि विराट कोहली अडकले विवाहबंधनात

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटसंघाचा कर्णधार विराट कोहली हे सोमवारी अखेर विवाहबंधनात अडकले. इटलीत बोर्गो फिनोचितो हाॅटेलमध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्न सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबीयांंच्या जवळच्या व्यक्ती आणि मित्र परिवार हजर होते. बऱ्याच दिवसांपासून   देशभरात सुरु होती मात्र दोघांनी लग्नाबाबतचे गुपित चांगलेच राखले होते. या लग्नसोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडून गुप्तता राखण्याचा फाॅर्म साईन करून घेतला. अगदी कॅटरिंगवाल्यांकडूनही. त्यांनाही तंबी दिली गेली की कुणी काही बाहेर बोललं तर काँट्रॅक्ट रद्द करण्यात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा सोहळा १५ डिसेंबर पर्यंत इटलीत रंगणार असून २१ डिसेंबर रोजी मुंबई मध्ये लग्नाचे रिसेप्शन होणार आहे.


No comments:

Post a Comment