Wednesday, 27 December 2017

छोटा राजनच्या हत्येचा दाऊदचा कट उधळला

छोटा राजनच्या हत्येचा दाऊदचा कट उधळला


तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजनची तुरुंगातच हत्या करण्याचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आखला होता. दिल्लीतील स्थानिक गुंड नीरज बवानाच्या मदतीने राजनची हत्या करण्याचा दाऊदचा कट होता. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिहार प्रशासनाला या कटाची माहिती मिळताच त्यांनी हा कट उधळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले. राजनच्या हत्‍येच्या कटातील एका सहकाऱ्याने दारूच्या नशेत या कटाबाबत सांगितल्यामुळे ‘डी’ कंपनीचा कट उधळला. बवानाचा एक सहकारी नोव्हेंबर महिन्यात तुंरूगातून बाहेर आला आहे. राजनच्या हत्‍येबाबत माहिती मिळाल्‍यानंतर त्‍याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment