Monday, 11 December 2017

खासदार सुप्रिया सुळे यांना अटक

खासदार सुप्रिया सुळे यांना अटक



नागपूर विमानतळ रोडवर सोमवारी  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली 'चक्का जाम आंदोलन 'केले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांना चक्का जाम आंदोलन करताना पोलिसांनी अटक केली. चक्का जाम आंदोलनात कार्यकर्त्यांनी ‘नही चलेंगी, नही चलेंगी, तानाशाही नही चलेंगी आणि हल्लाबोलच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी यावेळी पोलिसांनी सुप्रिया सुळे यांच्यासह इतर नेत्यांना, कार्यकर्त्याना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. नागपूर येथे सोमवार पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. भाजपसरकारच्या शेतकर्यांविषयीच्या हलगर्जीपणा विरोधात हे आंदोलन छेडण्यात आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नागपुरात आंदोलन करणार आहेत.


No comments:

Post a Comment