शेतकऱ्यांना मिळणार बोंडअळीच्या नुकसानीची भरपाई

केवळ जळगाव जिल्ह्यापुरताच बोंडअळीचा प्रश्न मर्यादित नसून विदर्भ, मराठवाडा व संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा प्रश्न असल्यामुळे याबाबत राज्यस्तरावरच निर्णय होईल. पण याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल, त्यांचे नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत तसेच त्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पाटील पुढे म्हणाले, भाजपा-सेना सरकारने गेल्या ३ वर्षात शेतक-यांचे नुकसान होऊ दिलेले नाही. बोंडअळीमुळे आताही झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ही समस्या चुकीचे बियाणे पोहोचविल्यानेच उद्भवली असल्यामुळे बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले असून नोटीसही बजावली आहे. कंपन्यांनीही नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे.
No comments:
Post a Comment