महाराष्ट्र राज्य इन्कम टॅक्स भरण्यात प्रथम
प्राप्तिकर खात्याने जाहीर केलेल्या एका आकडेवारी नुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी देशातील ४ कोटी दहा लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरला आहे. पण, त्यातील दोन कोटी लोकांनी आपली मिळकत नॉन टॅक्सेबल असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली ही सर्वाधिक कर भरणारी राज्ये आहेत, असे प्राप्तिकरच्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांतून सर्वाधिक प्राप्तिकर जमा झाला आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३७ टक्के कर जमा झाला आहे. पाठोपाठ दिल्लीतून १२.८, कर्नाटकमधून १०.१, तमीळनाडूतून ७,१, गुजरातमधून ४.६, आंध्र प्रदेशातून ४.३, पश्चिम बंगालमधून ४.१, उत्तर प्रदेशमधून ३.५, हरियाणातून २.४ तर राजस्थानमधून २.४ टक्के कर जमा झाला आहे. तीन वर्षांत दुप्पट कर गोळा करण्याची किमया तेलंगणा राज्याने केली आहे.
No comments:
Post a Comment