Sunday, 31 December 2017

कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीला भीषण आग

कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीला भीषण आग  


मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिलन कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत झालेल्या भीषण अग्नितांडवात 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधी यांनी मराठीतून पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे. ट्रेड हाऊस इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली होती. यात 15 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पब आणि रेस्टॉरन्टच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घटनास्थळी भेट दिली व चौकशीच्या सूचना केल्या आहेत. तसेच बीएमसीचे ५ अधिकारी देखील या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत. 


No comments:

Post a Comment