Saturday, 9 December 2017

दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द

दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द

दिल्लीतील शालिमार बागमधील मॅक्स हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणी आलेल्या तपास अहवालानंतर दिल्ली सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, जीवंत बाळाला अशाप्रकारे मृत जाहीर करण्यासारखे दुर्लक्ष कधीही स्वीकार ठरू शकत नाही. गुरुवारी हॉस्पिटलने २२ आठवड्यांच्या नवजात अर्भकाला मृत घोषित करत एका पिशवीत बांधून त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले होते. मात्र जुळ्या बाळांना अंत्यसंस्कारासाठी नेत असताना एका बाळाने हालचाल केल्यानंतर ते जीवित असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले व ताबडतोब त्या बाळाला दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले होते. मॅक्स दवाखान्याने यात सामील असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करीत दोन डॉक्टरांना निलंबित केले होते. मात्र आता दिल्ली सरकारने त्यांचा परवानाच रद्द केला आहे.


No comments:

Post a Comment