Thursday, 14 December 2017

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ


जून २०१५ नंतर मंगळवारी पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या दराने प्रतिबॅरल ६५ डॉलरपेक्षा मोठी झेप घेतली आहे. यापूर्वीच पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करणार्‍या देशांच्या संघटनेने (ओपेक) उत्पादनात कपात केली असताना ब्रिटनची सर्वात मोठी नॉर्थ सी ऑइल पाईपलाईन अचानक बंद झाली आहे. याचा थेट परिणाम तेलाच्या किंमतीवर झाला आहे. सध्या तेलाच्या किंमती ३० महिन्यांतील सर्वांत उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. यामुळे नजिकच्या काळात देशामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षात अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. सध्या ब्रेंट कू्रडच्या किंमती वाढून त्या ६५.५९ डॉलर्सवर पोहोचल्या आहेत तर यूएस क्रूडच्याही किंमती वाढून त्या ५८.४८ डॉलर्सच्या घरात गेल्या आहेत.


No comments:

Post a Comment