Sunday, 17 December 2017

राजकुमार रावचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीतून बाहेर

राजकुमार रावचा ‘न्यूटन’ ऑस्कर शर्यतीतून बाहेर


ऑस्करच्या शर्यतीतून चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा राजकुमार रावचा ‘न्यूटन’ हा चित्रपट बाहेर पडला आहे. भारताकडून ‘ऑस्कर’च्या परदेशी भाषेतील चित्रपटांच्या विभागासाठी अधिकृतपणे‘न्यूटन’ची प्रवेशिका पाठवण्यात आली होती. ‘न्यूटन’ला ऑस्करच्या शर्यतीत वेगवेगळ्या भारतीय भाषांमधील २६ चित्रपटांमधून पाठवण्याचा निर्णय १४ सदस्यीय निवड समितीने घेतला होता. ‘न्यूटन’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पूर्वीच ऑस्करच्या शर्यतीत असल्याचे जाहीर करण्यात आल्याने दिग्दर्शक अमित मसुरकर आणि अभिनेता राजकुमार यांनी आनंद व्यक्त केला होता. पण ऑस्करमधून हा चित्रपट बाहेर पडल्याने आता तमाम भारतीयांची निराशा झाली आहे. अकॅडमी अवॉर्डच्या‘फॉरेन लॅग्वेज फिल्म अवॉर्ड’ (परदेशी भाषा) विभागात जागा मिळवणा-या नऊ चित्रपटांची यादी ऑस्करने ट्विटरवरून जाहीर केली. ‘अ फनटॅस्टिक वूमन’, ‘इन द फेड’, ‘ऑन बॉडी अ‍ॅण्ड सोल’, ‘फॉक्सट्राट’, ‘द इनसल्ट’, ‘लव्हलेस’, ‘फेलिसीट’, ‘द स्क्वायर’, ‘द वूंड’ चित्रपटांचा या यादीत समावेश आहे.


No comments:

Post a Comment